- दिवाणखवटी बोगद्यानजीक दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीत व्यत्यय
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे ते दिवाणखवटी दरम्यान रुळावर दरड कोसळल्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सात गाड्या रद्द करण्यात आल्या असून सात एक्सप्रेस गाड्या या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
खेडनजीक कोकण रेल्वे मार्गावर रविवारी सायंकाळी चार वाजून 48 मिनिटांच्या सुमारास विन्हेरे ते दिवाणखवटी दरम्यान असलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गाशेजारी रुळांवर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक चार दिवसात दुसऱ्यांदा वीस विस्कळीत झाली आहे. यापूर्वी गोव्यात पेडणे बोगद्यात रुळांवर पाणी आल्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीत बाधा आली होती. रविवारी सायंकाळी खेड तालुक्यातील दिवाणखवटी बोगद्यानजीक रेल्वे मार्गावर दरडीची माती आल्यामुळे वाहतुकीस विस्कळीत झाली आहे.
या गाड्या रद्द/ या गाड्या पर्यायी मार्गे

