Konkan Railway | आठ ट्रेनमध्ये अडकून राहिलेले साडेचार हजारहून अधिक प्रवासी एसटी बसने रवाना

कोकण रेल्वेने केली पर्यायी व्यवस्था

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे रेल्वे कडून आठ रेल्वे गाड्यांमध्ये अडकून राहिलेले 4623 प्रवाशांना एकूण 103 एसटी बसेसमधून मुंबईच्या दिशेने पाठवण्यात आले. पेमेंट काल सायंकाळपासून रेल्वे वाहतूक सुरू झाली असून, कोकण रेल्वेचे वेळापत्रक हळुहळू पूर्व पदावर येऊ लागले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी बोगद्यानजीक दरड कोसळून रविवारी सायंकाळी बंद करण्यात आलेली वाहतूक तब्बल 24 तासांच्या प्रयत्नानंतर पूर्वपदावर आणण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळलेल्या ठिकाणचा मार्ग वाहतुकीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यावर रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. वाहतूक सुरू होताच मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसचा रिकामा रेक घटनास्थळावरून पहिल्यांदा पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्या फोटो पाठवून राहिलेल्या इतर गाड्या देखील या ठिकाणाहून मार्गस्थ करण्यात आल्या. आता हळूहळू कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्वस्थितीत येऊ लागले आहे.

खेड तालुक्यातील दिवाणखवटी नजीक रविवारी सायंकाळी चार वाजून 48 मिनिटांनी मुसळधार पाऊस सुरू असताना दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे दिनांक 14 व 15 रोजी च्या या मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. विविध स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांना कोकण रेल्वेने शेकडो एसटी बसेसमधून मुंबई तसेच पनवेलच्या दिशेने पाठवले.
सोमवारी सायंकाळी वाहतूक सुरू झाल्यानंतर दुर्घटनाग्रस्त पहिली गाडी मांडवी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE