आरवली : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभवासाठी कासेमधील कृषीवृंद या संघाकडून चारसुत्री या भात लागवड प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात आले. योग्य नियोजन व व्यवस्थापन करून पिकाचे उत्पादन कसे वाढवता येईल हे त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
या प्रकारात दोन रोपांच्या मध्ये 15-25×15-25 येवढे अंतर घेऊन लावणी करण्यात आली. तसेच गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले व ग्रामस्थांनाही माहिती आवडली व त्यांनी एक निर्णय घेतला आहे की पुढच्या वेळी पासून चार सूत्री भात लागवड जास्त प्रमाणात करण्यात येईल.
यावेळी माहिती सांगताना कृषिदूत यश जाधव, अथर्व गावडे, सौरभ गरुड, ओंकार बोधगिरे, रुझान मुलानी, विश्वजीत जाधव, शांतनु पवार, शुभम गायकवाड, शुभम पाटील, प्रणव जांभळे,महेश पाटील व राज पाटील इत्यादी उपस्थित होते.
