लांजा : लांजा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अधिकारी आणि सहकार कार्यकर्ते प्रदीप रामचंद्र देसाई यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी आज बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रदीप देसाई हे लांजा विविध कार्यकारी सोसयटीचे माजी संचालक होतें लांजातील सहकार चळवळीचे प्रणेते कैलासवासी छोटूभाई देसाई यांचे ते पुत्र होत. प्रदीप हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनेक वर्ष नोकरीला होते. त्यांच्या मागे भाऊ, पत्नी, मुले असा मोठा परिवार आहे
