उरणमध्ये जेएनपीए रोडवरील अपघातात एकाचा मृत्यू ; दोघे जखमी

उरण दि ७ (विठ्ठल ममताबादे ) :  करळ फाटा ते जे एन पी ए या मार्गावर नागरिकांची रहदारी सुरक्षित पणे होण्यासाठी, अनेक उड्डाण पुल बांधण्यात आले आहेत तरीही ट्रेलरच्या बेशिस्त वाहतुकीमुळे उरण परिसरात अपघातांचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीत. मग तो दास्तान ते दिघोडे चिरनेर मार्ग असो वा खोपटा ते उरण रस्ता असो अपघातांचे सातत्य चालूच आहे.

आज दिनांक ७ रोजी जे एन पी ए रोडवरील पी यु बी न्हावा शेवा कस्टम ऑफिस नजिकच्या रोडवर सकाळी सात वाजण्याच्या च्या सुमारास रिक्षा व ट्रेलर चा भिषण अपघात झाला आहे.


सदरच्या अपघाताचे सविस्तर वृत्त असे की रात्रपाळी करून भरत ठाकूर केळवणे, भोम येथील सचीन म्हात्रे आणि आकाश चौगुले हे तिघे रिक्षातून घरी येत असताना पी यु बी येथे आले असता समोरून येणाऱ्या भरधाव ट्रेलर ने रिक्षास जोरदार धडक दिली यामध्ये भरत ठाकूर जाग्यावरच मयत झाले तर सचीन म्हात्रे, आकाश चौगुले यांस गंभीर मार लागला आहे. सदरचा अपघात पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष अनिकेत वसंत तांडेल हे ड्युटीवर जात असताना त्यांनी प्रत्यक्ष पाहीला व त्यांनी त्यांच्या संपर्कातील न्हावा शेवा पोलिस स्टेशनचे पी एस आय दिपक दाभाडे यांना संपर्क साधला असता त्यांनी पोलीस व ॲंब्युलन्स पाठवतो असे सांगितले.

यावेळी डीपी वल्ड ची रुग्णवाहिका येऊन अपघात ग्रस्त तिनही व्यक्तींना जे एन पीए हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले यावेळी भरत ठाकूर हे मयत झाल्याचे सांगण्यात आले. सचीन म्हात्रे व आकाश चौगुले यांना पुढील उपचारासाठी वाशी येथील एम जी एम रुग्णालयात हलविण्यात आले आहे असे समजते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE