देवरूख (सुरेश सप्रे) : मुंबई पोलीस दलातील एसीपी व देवरुखचे सुपुत्र विजय मोहन हातिस्कर यांना पोलिसातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
विजय हातिस्कर हे मुळचे रत्नागिरी मिऱ्या येथील आहेत. वडील मोहन हातिस्कर हे नोकरीनिमित्त देवरूखात आले व स्थाईक झाले. विजय (बाळू) यांचा जन्म देवरूखात झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण भोंदे शाळेत तर माध्यमिक शिक्षण न्यु इंग्लिश स्कूल देवरूख येथे झाले. सन१९८१ला एससीसी झालेवर उच्च शिक्षण रत्नागिरीत झाले. विद्यार्थीदशेपासुन पोलीस निरीक्षक होण्याचे ध्येय बाळगलेले विजय हे १९९२ला पोलीस दलात निरिक्षक म्हणून दाखल झाले. विजय हातिसकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरिता १५ आॅगस्ट २०२४ रोजी राष्ट्रपती चे पदक जाहीर झाले.
श्री. हातीसकर यांनी रायगड, सिंधुदुर्ग. मुंबई येथे काम केले. १७ वर्ष मुंबई येथे सेवेत असून रायगड व मुंबईमध्ये आरसीएफ, मालाड या पोलीस ठाण्यात मध्ये अनेक तपास केलेल्या गंभीर गुन्हयांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. अनेक फरारी आरोपी पकडले असून अनेक गंभीर गुन्हे ची उकल केली आहे.
सध्या मुंबई पोलिसात ACP या पदावर सेवा बजावत आहेत. विजय हे सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी येथे आपल्या कामाचा ठसा उमटवून सेवा निवृत्त झालेले उप अभियंता संजय हातिस्कर यांचे कनिष्ठ बंधू आहेत.
त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानंतर संगमेश्वर तालुक्यासह जिल्हाभरातू त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
