उलवे नोडमध्ये नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्याची मनसेची मागणी

उरण दि १६ (विठ्ठल ममताबादे ) : उलवे नोडमध्ये नागरी आरोग्य सुरू करावे अशी मागणी नवनिर्माण सेनेकडून सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांकडून नागरिकांचे होणारे आर्थिक लोक थांबवण्यासाठी यासाठी मनसे कडून पाठपुरावा सुरू आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवे नोड गव्हाण विभागातील पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा चालु आहे की, उलवे नोडमध्ये नागरी आरोग्य केंद्र चालु करण्यात यावे व खासगी रुग्णालयाकडुन होणारी नागरिकांची आर्थिक लुट थांबावी  यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उलवे शहर अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील व पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष केशव गोंधळी यांनी काही दिवसापूर्वी सिडको अधिकारी डाॅ. बाविस्कर व पनवेल आरोग्य केंद्र यांना निवेदन दिले होते.

त्याच अनुषंगाने आज पनवेल आरोग्य केंद्राचे अधिकीरी सुनील नखाते यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करण्यात आली व लवकरात लवकर उलवे नोडमध्ये आरोग्य केंद्र ( हाॅस्पीटल) चालु करण्यात यावे असे स्मरणपत्र देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उलवे शहर अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील, पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष केशव गोंधळी,उलवे गाव शाखा उपाध्यक्ष संदीप म्हात्रे व ॲड शुभम मढवी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE