रत्नागिरी : पुणे येथून गोवा तसेच सिंधुदुर्गसाठी थेट प्रवास विमानसेवा दिनांक 31 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत आहे. सिंधुदुर्गसह गोव्यातील पर्यटनाला यामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे.
फ्लाय 91 कंपनीच्या विमानसेवाला यासाठी परवाना मिळाला आहे. पुणे ते गोवा तसेच पुणे ते सिंधुदुर्ग या प्रवासासाठी फ्लाय 91 कंपनीच्या विमान प्रवास भाडे 1991 रुपयांपासून पुढे सुरु होते.
याबाबत फ्लाय 91 या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पुणे येथून गोव्यासाठी सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी विमान उड्डाण घेईल तर गोव्याला ते बारा वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल.

पुणे येथून सिंधुदुर्ग साठी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी विमान सुटणार आहे. नऊ वाजून दहा मिनिटांनी ते सिंधुदुर्ग विमानतळ शनिवार व रविवार अशी दोन दिवस सध्याची सेवा उपलब्ध असेल, असे फफ्लाय 91 कंपनीने म्हटले आहे.
