लांजा ग्रामीण रुग्णालय सांस्कृतिक भवन इमारतीत स्थलांतरित

लांजा : लांजा ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज आता आज गुरुवार 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी सांस्कृतिक भवन येथे या इमारती स्थलांतरित करण्यात आले आहे. बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग या इमारतीत सुरु झाला आहे.

स्थलांतरित इमारतीचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट न झाल्याने एक वर्ष होऊनही नवीन इमारतीचे बांधकाम कामाला प्रारंभ झालेला नव्हता यावर ‘डिजी कोकण’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर फायर ऑडिट अहवाल आल्यानंतर जुन्या इमारतीमधील कामकाज आजपासून स्थलांतरित करण्यात आले आहे. जुनी इमारत पाडण्याच्या कामाला आता प्रारंभ होणार आहे.


पालकमंत्री उदय सामंत यांनी 31 जुलैला नवीन इमारतीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. 31 जुलैची ‘डेडलाईन’ होती सुमारे 12 कोटी रुपये खर्च ची नवीन इमारतची निविदा प्रक्रिया होउन वर्ष उलटले आहे. जुन्या इमारतीतील लांजा ग्रामीण रुग्णालय कामकाज आता सांस्कृतिक भवन च्या इमारतीत स्थलांतर होणार असल्यानं परंतु सांस्कृतिक भवन या इमारतीच ‘फायर सेफ्टी ऑडिट’, तसेच रुग्णालयातील वैद्यकीय विद्युत उपकरणांचे ‘इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट’ करण्याचे आदेश आहेत. तसा प्रस्ताव लांजा सार्वजनिक बांधकाम विभागाने अग्निशामक प्राधिकरण आणि महावितरणला दिला आहे. परंतु फायर ऑडिटचा अहवाल आलेला नव्हता.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE