रत्नागिरी दि.२३: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शनिवार २४ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पजाहीर झाला आहे.
दौरा कार्यक्रमांनुसार ना. आठवले हे शनिवार २४ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ११.४८ वाजता मांडवी एक्सप्रेसने खेड रेल्वेस्थानक येथे आगमन. दुपारी १२.१५ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे उद्घाटन (स्थळ: सम्राट अशोक नगर, खेड जि. रत्नागिरी). दुपारी १ वाजता मेळाव्यास प्रमुख उपस्थिती (स्थळ: बासू हॉटेल अँड रिसॉर्ट, भरणे नाका, खेड जि. रत्नागिरी). दुपारी १.४५ वाजता समाजकल्याण अधिकारी यांच्या समवेत बैठक (स्थळ: सा.बां.विभाग विश्रामगृह, खेड जि. रत्नागिरी). दुपारी २ वाजता पत्रकार परिषद (स्थळ: सा.बां.विभाग विश्रामगृह, खेड जि. रत्नागिरी). राखीव (स्थळ: शासकीय विश्रामगृह, खेड जि. रत्नागिरी). सायंकाळी ४ वाजता खेड रेल्वेस्थानकाकडे प्रयाण व मांडवी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
