पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला विविध कामांचा आढावा


रत्नागिरी, दि. 25 : पालकमंत्री उदय सामंत यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शहरातील रस्ते, लोकमान्य टिळक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कॅशलेस, वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयातील कामकाज तसेच दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबतचा आढावा घेतला.

एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप,
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, डॉ. अमरेश आगाशे, डॉ. सांगवीकर, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री सामंत यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालय रिक्त पदे, भूलतज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ संदर्भातील आढावा घेतला. ते म्हणाले, रुग्णांच्या सेवेत कोणतीही अडचण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
तारांगण येथे सुरू असलेल्या सायन्स गॅलरी च्या कामाचा आढावाही घेतला. गॅलरीचे काम पूर्ण झाले असून, इतर काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुख्याधिकारी श्री. बाबर यांनी दिली. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने पाठपुरावा करा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग 166 व 66 च्या कामाचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले गणेशोत्सव सात तारखेपासून सुरू होत आहे. यासाठी मुंबई पुण्यातून चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सवासाठी कोकणात येतील. येणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गावर कोणती अडचण होणार नाही, त्याची दक्षता घ्या. ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते भरून घ्या. पोलिसांशी समन्वय साधून महामार्गावर कोठेही ट्राफिक होणार नाही याची काळजी घ्या.

लोकमान्य टिळक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कॅशलेस करण्याबाबतचा देखील पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. कॅशलेस हॉस्पिटलचा उद्घाटन 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान करायचा आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याची सूचनाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिली. यावेळी मुख्याधिकारी श्री बाबर यांनी कॅशलेस हॉस्पिटल संदर्भात सुरू असलेल्या कामाची माहिती दिली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE