वांद्रे-मडगाव नवीन रेल्वे गाडीचे चिपळूणमध्ये स्वागत!

चिपळूण : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणि गुरुवारी दुपारी मुंबईहून मडगावकडे येण्यास निघालेल्या वांद्रे -मडगाव रेल्वे गाडीचे स्वागत चिपळूण रेल्वे स्टेशनवर रात्री 9.30 वाजता कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांच्या हस्ते करण्यात आले. शुभारंभाच्या या गाडीचा उद्घाटन सोहळा बोरिवली येथे पार पडला.

यावेळी त्यांच्या समवेत कोकण रेल्वेचे  रेल्वेचे सहाय्यक अभियंता श्री. जोशी, वाणिज्य निरीक्षक संज मुळे, कर्मचारी शशिकांत वाजे तसेच ही गाडी घेऊन आलेले रेल्वेचे लोको पायलट अभय दाभोळकर, सुचित भुरण, संतोष हरचिलकर, उपसरपंच गजानन महाडीक, आदिल मुकादम आदी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE