डेरवण येथे जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा सुरू

रत्नागिरी : डिस्ट्रिक्ट शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ रत्नागिरी व जिल्हा क्रीडा विभाग – रत्नागिरी यांच्या संलग्नतेने आज दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी, जिल्हास्तरीय रायफल शुटींग स्पर्धा एस.व्ही.जे.सी. टी. क्रीडा संकुल, डेरवण, चिपळूण, येथे सुरू झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावला असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष श्री. विक्रांत रमाकांत देसाई यांनी सांगितले. श्री. विनय रमाकांत देसाई हे जिल्हा संघटनेचे सचिव असून ते स्वतः प्रख्यात पिस्टल खेळाडू आहेत. त्यांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदकांची प्राप्ती केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावे जे भविष्यात जिल्ह्यासह देशाचे प्रतिनिधित्व करतील, हा संघटनेचा मानस आहे. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंची निवड कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी होणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE