लांजा तालुक्यात साटवली येथे आढळले अमेरिकेत सापडणारे फुलपाखरू!

लांजा : लांजा तालुक्यात साटवली बेनी येथे दुर्मिळ असे पोपटी रंगाचे परिप्रमाणे दिसणारे अमेरिकन फुलपाखरू आढळले आहे.

येथील सामजिक कार्यकर्ते असलेले पत्रकार वैभव वारीसे यांनी या फुलपाखराचे चित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहे विशेषतः अमेरिकेच्या उत्तर भागात हे फुलपाखरू सर्वसाधारणपणे आढळते. यापूर्वी हातिवले काँलेजच्या प्राध्यापकांना अँक्टीनास ल्युना हे फुलपाखरू राजापूरमध्ये आढळून आले होते. त्यामुळे निसर्गप्रेमीमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे.


या फुलपाखराच्या पंखाची रचना परीप्रमाणे आहे. पंखांचा रंग फिकट पोपटी आहे. हे फुलपाखरू भारतात क्वचित आढळते. याच्या पंखावर चंद्रासारखे गोल आकार आहेत. ते कलेकलेनी वाढत जावून तो पुर्ण चंद्र होतो. यापूर्वी आसाममध्ये २०१० सालात सोनेरी जंगलात या जातीचे फुलपाखरू आढळून आले होते.

राजापूर तालुक्यातही गेल्या काही वर्षापासून दुर्मिळ फुलपाखरू आढळून येत आहेत. यात माऊल माॅथ, मनू माॅथ, सिल्क माॅथ आणि ॲटलास या दुर्मिळ फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या होत्या. आता यात आणखी एका अमेरिकन दुर्मिळ फुलपाखराची भर पडली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE