अनिकेत लोहिया सामाजिक तर शिवाजी माने यांना विज्ञान नवनिर्माण गौरव पुरस्कार जाहीर

  • रत्नागिरी येथे २६ ऑक्टोबर रोजी पुरस्कार प्रदान कार्यक्रम

संगमेश्वर दि. २० :  नवनिर्माण शिक्षण संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष. कोकणात सुरु झालेल्या अनवाणी पायाच्या महाविद्यालयाचा हा पाव शतकाचा प्रवास या निमित्ताने येत्या वर्षापासून २०२४ चा नवनिर्माण गौरव पुरस्कार , सामाजिक क्षेत्रात विशेष , अतुलनिय काम करणाऱ्या ‘मानवलोक’ संस्थेचे अध्यक्ष ( जलदूत) अनिकेत लोहिया (आंबेजोगाई) यांना तर विज्ञान क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिवाजी माने ( जढाळा, लातूर) यांना जाहिर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप रुपये २५.०००/- रोख , सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे.

दि.२६ ॲाक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ४. ३० वा. पुरस्कार वितरण सोहळा नवनिर्माण शिक्षण संस्था, एस.एम जोशी विद्यानिकेतन, रत्नागिरी येथे डॅा. गणेश देवी, डॅा. भालचंद्र मुणगेकर, डॅा. झहीर काझी, नितीन वैद्य या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

अनवाणी पायांचे महाविद्यालय म्हणून सुरु धालेली नवनिर्माण शिक्षण संस्था २५ वर्षात, आज एका विशिष्ठ टप्यावर पोहोचली आहे. शालेय शिक्षणापासून महाविद्यालयीन उच्च शिक्षणाचा टप्पा पार करत यशस्वीतेचे, कर्तुत्वाचे आणि समाजात काही घडू पहाणार्या आणि घडवू पहाणार्या विद्यार्थी युवकांची धडपड, प्रयत्न पाहिले. प्रतिकुल प्ररिस्थितीत अनेकवेळा सैरभैर होणार्या वाटचालीचे साक्षिदार होण्याचा हा दिर्घ कालावधी. आपल्या परिघाच्या बाहेर डोकवतांना अनेक रचनात्मक आणि निर्माणाच्या कामांची धडपड सुरु असते. जी या धडपडणार्या चाचपडणार्या आणि उत्तुंग झेपावणाऱ्या विद्यार्थी युवकांसाठी प्रेरणादाई आणि प्रज्वलीत करणारे अंकुर मनात जागवू शकते.

अनिकेत लोहिया,
सामाजिक नवनिर्माण पुरस्कार.
शिवाजी माने, नवनिर्माण विज्ञान (पुरस्कार )

अशा विविध क्षेत्रातील जिनिअसनां संस्थेच्या माध्यमातून सन्मानित करत त्यांचे आदर्श, धडपड कोकणच्या नवनिर्माणच्या विद्यार्थी, पालक, युवक आणि तमाम रत्नागिरीकरांसाठी एक प्रेरणास्त्रोत, मानदंड असावा अशी प्रचंड इच्छा गेल्या दशकाची. त्याला छात्रभारती, राष्ट्र सेवादलाच्या वैचारिक आणि चळवळीची साथ होतीच. आज २५ वर्षानिमित्ताने हा संकल्प नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पुढील दिर्घ काळासाठी सुरु करत आहे.


महाराष्ट्रात विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनिय काम करणाऱ्या मान्यवरांचा संस्थेतर्फे सत्कार करावा त्यांना संस्थेत बोलवावे, त्यांच्या वैशिष्ठ्यपुर्ण कार्याची ओळख नवनिर्माण परिवार आणि रत्नागिरीकरांना व्हावी. या उद्देशाने संस्थेने चार क्षेत्रांची निवड केली आहे. यांतील विज्ञान, शिक्षण, सामाजिक, साहित्य या चार क्षेत्रात दरवर्षी दोन क्षेत्रांतील विशेष उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था यांना नवनिर्माण गौरव पुरस्काराने रत्नागिरी येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात येईल. २५०००/- रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असेल.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE