मुंबई : राज्य परिवहन महामंडळाकडून चालक व वाहकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह खुले झाले आहे.
मुंबई सेंट्रल येथील नूतनीकरण केलेल्या वातानुकुलित चालक – वाहक विश्रांतीगृहाचे उद्घाटन विधानसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
एसटीचे चालक वाहक यांच्यासाठी असलेल्या विश्रांती गृहाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. ते पूर्ण झाल्याने राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या आधी हे विश्रांतीगृह चालक वाहकांच्या सेवेकरता खुले करण्यात आले आहे. कर्तव्य बजावून विश्रांतीसाठी थांबणाऱ्या एसटी चालक वाहकांना या सुविधेमुळे आरामदायी सेवा मिळू शकणार आहे.
