- जिल्ह्यात नऊ उमेदवारांची १७ नामनिर्देशनपत्र दाखल
- दापोली, गुहागरमध्ये प्रत्येकी २, चिपळूणमध्ये ६ तर राजापुरात ७
रत्नागिरी, दि. २४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी 4 मतदार संघात 9 उमेदवारांनी 17 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. यात रत्नागिरी विधानसभा मतदार संघात अद्याप एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी दाखल झालेल्या विधानसभा मतदार संघनिहाय नामनिर्देशन पत्रांची माहिती पुढीलप्रमाणे..
263-दापोली विधानसभा मतदार संघात कदम संजाय वसंत – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), आणि कदम योगेश रामदास – शिवसेना यांनी प्रत्येकी 1 नामनिर्देशन पत्र दाखल केले.

264 – गुहागर विधानसभा मतदार संघात जाधव भास्कर भाऊराव -शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी 2 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.
265- चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये प्रशांत बबन यादव – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार आणि स्वप्ना प्रशांत यादव – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार यांनी प्रत्येकी 3 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.
266- रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये एकही नामनिर्देशन दाखल झाले नाही.
267- राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये किरण रविंद्र सामंत – शिवसेना यांनी 3, राजन प्रभाकर साळवी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी 2 , आणि अविनाश शांताराम लाड – अपक्ष, यशवंत रामचंद्र हर्यान – अपक्ष
