रत्नागिरी जिल्ह्यात आप ‘मविआ’ सोबत नाही : जिल्हाध्यक्ष परेश साळवी

रत्नागिरी : अद्याप मविआ सोबत जाण्यासंबंधात कोणतीही सुचना पक्षाकडून आलेली नाही, आणि असे आदेश आम आदमी पक्षात चालत नाहीत, असे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी यांनी सांगितले.

विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर परेश साळवी यांनी म्हटले आहे की, आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता हा स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून काम करत असतो.
लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने INDIA आघाडीत सामील होण्याचे चटके सोसलेले आहेत, बर्‍याच ठिकाणी मविआ उमेदवारांची पाठिशी उभे रहाताना कार्यकर्त्यांवर उमेदवारांच्या जुन्या भ्रष्टाचारांचे समर्थन करण्याची वेळ येते.

रत्नागिरीतून ज्योतिप्रभा पाटील हे आपचे उमेदवार असतील, तर इतर मतदारसंघात विकास व सामन्य जनतेचे हित लक्षात घेऊन योग्य उमेदवारांस पाठींबा देणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. परेश साळवी यांनी सांगीतले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE