वीर वाजेकर महाविद्यालयाची “मतदार जागृती अभियान रॅली

उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे ) : २६ ऑक्टोबर २०२४ रोजी वीर वाजेकर फुंडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना,सांस्कृतिक विभाग,विद्यार्थी परिषद व डी. एल.एल.ई. विभागाच्या वतीने,जसखार, करळ व सोनारी गावातून रॅली काढण्यात आली. उरण तहसील कार्यालय व निवडणूक विभागाच्या तसेच मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सूचनेनुसार सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर, मतदार साक्षरता अभियानाचे प्रमुख डॉ.संदीप घोडके,राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.राम गोसावी,सांस्कृतिक विभागाच्या डॉ.सुजाता पाटील,प्रा.भूषण ठाकूर,प्रा.गजानन चव्हाण तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकानी सहभाग नोंदविला. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी मतदार जागृती विषयक घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांना प्रवासासाठी माजी विद्यार्थी संघाने बसची व्यवस्था केली.तसेच सर्व विद्यार्थ्यांना शीत पेय व नाश्ताची व्यवस्था सुद्धा माजी विद्यार्थ्यांनी केली.मतदार जागृती अभियानामध्ये पथनाट्य,घोषणा देण्यात आल्या.

या रॅलीस महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तसेच सदस्यांनी सहकार्य केले.न्हावा-शेवा पोलीस स्टेशनच्या वतीने सहकार्य करण्यात आले.सर्व पात्र नागरिकानी मतदान केले पाहिजे आशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या.महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे रॅलीचे आयोजन यशस्वी पार पडले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE