Maharashtra Election 2024 | राज्यभरात भरारी पथकांकडून सहा हजार वाहनांची तपासणी

रत्नागिरीत ३५ लाखांचे विनापावती सोने पकडले

रत्नागिरी / मुंबई : आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्यभर तैनात करण्यात आलेल्या स्थिर व भरारी सर्वेक्षण पथकांमार्फत एकूण ६ हजार वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. आतापर्यंत ५०० कोटी रुपयांहून अधिक बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणीचा भाग म्हणून मुंबईवरुन रत्नागिरीकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाची तपासणी स्थिर सर्वेक्षण पथकाने केली असता, ३४ लाख ८५ हजार ९४७ रुपयांचे सोने विनापावती मिळून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली.

इको हे वाहन मुंबईहून रत्नागिरीकडे आज येत होते. रत्नागिरी विधानसभा मतदार संघाच्या एसएसटी पथकाने हातखंबा तपासणी नाक्यावर तपासणी करताना, या इको वाहनात ३४ लाख ८५ हजार ९४७ रुपयांचे सोने मिळून आले. याबाबत कोणतीही कागदपत्रे सोबत नसल्याने ते एसएसटी पथकाकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व एसएसटी आणि एफएसटी पथकांना विविध तपासणी नाक्यावर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पाचही विधानसभा मतदारसंघात एसएसटी, एफएसटी पथकांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE