राज्यात ४२६ मतदान केंद्रांवर अधिकारी, कर्मचारी सर्वच महिला!

मुंबई : विधानसभानिवडणूक २०२४ करिता 426 मतदान केंद्रांवर तैनात ठेवण्यात येणारे अधिकारी तसेच कर्मचारी सर्व महिलाच असणार आहेत. महिलांचा मतदानातील टक्का वाढवून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यात ४२६ ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत. निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह या केंद्रांमध्ये तैनात पोलिसही महिला असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE