व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला १६.५० रुपयांनी महाग

घरगुती गॅसच्या दरात मात्र कोणताही बदल नाही

नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तत्काळ प्रभावाने वाढ केली आहे.

नवीन महिन्याच्या प्रारंभी म्हणजेच १ डिसेंबर २०२४ पासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १६.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे तसेच ५ किलो फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरची किंमतही ४ रुपयांनी वाढली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत नोव्हेंबरमध्येही १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर ६२ रुपयांनी वाढवले होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE