रत्नागिरीत गजबजलेल्या रस्त्यावर सीएनजीच्या गळतीने घबराट

रत्नागिरी : रत्नागिरी- कोल्हापूर मुख्य मार्गावर डीमार्ट समोरील गजबजलेल्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे धक्के बसून सीएनजी वाहून नेणाऱ्या टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायूगळती होऊन झालेल्या मोठ्या आवाजाने डी मार्ट परिसरात शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एकच खळबळ उडाली.

घटनेनंतर एमआयडीसी तसेच नगर परिषदेच्या अग्निशमन पथकांनी तातडीने धाव घेतल्याने वायूगळतीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

या दुर्घटनेमुळे रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर तासभरापेक्षा जास्त काळ मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कोल्हापूर ते रत्नागिरीकडे येणारा मुख्य मार्ग हा खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरून महानगर गॅस कंपनीचा टँकर (क्र.7079) रत्नागिरीच्या दिशेने येत होता. शनिवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा टँकर कुवारबाव परिसरातील डी मार्ट समोरील ठिकाणी असताना त्यातून मोठय़ा प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. दोन व्हॉल्व्हमधून ही गॅस गळती सुरू होती. दुर्घटनेनंतर घटनास्थळावरून जाणाऱ्या  वाहनधारकांची देखील यामुळे पळापळ झाली. गळतीनंतर  टँकरमधील गॅस वेगाने बाहेर पडत होता.

दुर्घटनेनंतर झालेल्या गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व अनर्थ टाळण्यासाठी अग्निशमन पथकांना पारण करण्यात आले. पोलीस यंत्रणाही दाखल झाली. यामुळे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE