- चिपळूणचे आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नाने बसस्थानकाच्या विकासासाठी एक कोटीचा निधी मंजूर
संगमेश्वर : तालुक्यातील माखजन एस. टी. बसस्थानकाचे रुपडे आता पूर्णपणे बदलणार आहे. बसस्थानक परिसरातील खराब झालेले आवार खड्डे आणि चिखलाच्या समस्यांमुळे प्रवासी, नागरिक आणि एस. टी. कर्मचाऱ्यांना होणारा त्रास हे काम पूर्ण झाल्यानंतर टाळणार आहे.
आता या निधीच्या साहाय्याने बसस्थानकाचे सुशोभीकरण सुरू झाले असून, परिसरात दर्जेदार दुरुस्ती आणि आधुनिक सुविधांची उभारणी केली जात आहे. यामुळे स्थानकाचा कायापालट होणार आहे.
माखजन एस. टी. बसस्थानक हा परिसरातील प्रवाशांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. याचे काम वेळेत व चांगल्या प्रतीचे केले जाईल.
-शेखर निकम, आमदार, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ.
माखजन बस स्थानकाचे काम सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे तसेच तत्कालिन पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.
