- सई सावंत, प्रसन्ना गावडे, साहिल आंबेरकर यांची पंच म्हणून निवड
रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर यांनी आयोजित केलेली जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत एस. आर. के. तायक्वांदो क्लबचे खेळाडू सहभागी होणार आहेत.
सदर स्पर्धेकरीता जिल्हाभरातून सुमारे ६०० खेळाडू आपला सहभाग नोंदवतील. पूमसे व क्यूरोगी प्रकारात 7,12,14,18 वर्षाखालील व 18 वर्षांवरील या वयोगटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक देऊन सन्मानित करण्यात येईल. पदक संख्येनुसार सांघिक प्रथम, द्वितीय, तृतीय अस पारीतोषिक दिल जाणार आहे.या स्पर्धेसाठी क्लबच्या सई सावंत, प्रसन्ना गावडे, साहिल आंबेरकर यांची पंच म्हणून निवड झाली आहे.
स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून शाहरुख शेख आणि मिलिंद भागवत काम बघणार आहेत.
सदर स्पर्धेकरीता रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन एस. आर. के. तायक्वांदो क्लब यांचे पदाधिकारी आणि समस्त पालक वर्ग यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
