रत्नागिरी : सी.एस.डी. कॅन्टीन चिपळूणकरिता निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांकडून कॅन्टीन मॅनेजर पदाच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांनी हेडक्वाटर्स, दक्षिण महाराष्ट्र ॲण्ड गोवा सब एरिया (कॅन्टीन विभाग) ९०० ४४९, द्वारा अे.पी.ओ. यांना लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
या पदाकरिता कॅन्टीन व्यवस्थापक समितीकडून दरमहा रु.४५ हजार वेतन निश्चित करण्यात आले आहे. वरील पदासाठी कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे आहे.
