रत्नागिरी : राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची अधिसूचना बुधवारी प्राप्त झाली आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला होता.मात्र, त्याची अद्याप अधिसूचना निघालेली नव्हती. त्यामुळे आज राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली.

या बैठकीत संवाद साधल्यानंतर पुढील एका तासात अधिसूचना निघेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे यासंदर्भातील अधिसूचना केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह रेखावत यांनी महाराष्ट्राला सुपूर्द देखील केली. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीही अधिसूचना स्वीकारली.
या बैठकीला साहित्य संस्कृती मंडळ अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समिती अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ उपस्थित होते.
