महामार्गावर हातखंबा येथे ट्रेलरवर कार आदळून चालक ठार

रत्नागिरी :   गोवा – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हातखंब्यानजीक रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कारने अवजड ट्रेलरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालक ठार झाला.

अपघाताची माहिती अशी शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून हातखंब्याजवळ ट्रक  जीजे 27 टिएफ 6818 हा गोव्याहून नवी मुंबईकडे चाललला होता.  त्याला मागून येत असलेल्या कार एमएच 01 एएक्स 9281 ने जोराची धडक दिली. त्यात कारचालक नितीन श्रीकांत शिरवळकर, रा. मुंबई गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती  मिळताच श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची हातखंबा येथील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यातून जखमीला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात  दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.

दोन्ही वाहनांची धडक मोठी होती. त्यात कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला आहे. अपघतस्थळी लोकांनी गर्दी केली होती. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून वाहने बाजूला घेतली व वाहतूक पूर्ववत सुरू केली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE