पावसाळापूर्वी उरण नगर पालिका हद्दीतील नालेसफाईबाबत शिवसेना जागरूक

उरण शिवसेना उपशहरप्रमुख  गणेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण नगरपालिका हद्दीतील कुंभारवाडा येथील मोठया नाल्यातून संपूर्ण उरण शहराचे सांडपाणी व पावसाचे पाणी वाहत जात असते.परंतु गेल्या वर्षी या नाल्याची व्यवस्तीत साफ सफाई न झाल्याने पावसाळ्यात कित्येक वेळी येथे पाणी तुंबून उरण शहरात पूरपरिस्थिती सारखे दृश्य निर्माण झाले होते.परंतु या वेळी पावसाळापूर्वी उरण शिवसेना उपशहरप्रमुख  गणेश पाटील यांच्या पाठपुराव्याने व शिवसेना कुंभारवाडा शाखाप्रमुख  नितिन सावंत यांच्या पत्रव्यवहाराने प्रशासन जागे होऊन उरण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष माळी आपल्या सर्व टीमसह उपशहरप्रमुख  गणेश पाटील यांच्या बरोबर  सदर नाल्याची पाहणी करून मुख्याधिकारी यांनी ठेकेदाराला योग्य त्या सूचना करुन सदर कुंभारवाडा नाला त्वरित साफ करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे आज या नाल्याची योग्य ती साफसफाई करण्यात आली आहे.
या सामाजिक कार्याबद्दल उरणच्या जनतेने उरण शिवसेना उपशहरप्रमुख  गणेश पाटील, शिवसेना कुंभारवाडा शाखाप्रमुख  नितिन सावंत व शिवसेनेचे आभार मानले आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE