दक्षिण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी
रत्नागिरी : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले असून मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्गमध्ये पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे. यंदा मान्सून उशीरा दाखल होईल, असा अंदाज यापूर्वी हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र गेल्या तीन चार दिवसापासून रिझझिम पावसाला सुरुवात झाली होती शनिवारी संध्याकाळपासून जिल्ह्यात चांगलाच पाउस पडायला सुरुवात झाली आहे. रविवारी पहाटेपासूनच जिल्ह्याला पावसाने झोडपले.
जवळपास सगळीकडेच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून कोकणात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गतवर्षीपेक्षा अधिक पाउस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षी 19 जूनला जिल्ह्यात तुफान पावसाने धुमाकुळ घातला होता यंदा मात्र तितका जोर नाही येत्या तीन दिवसात मोठ्या प्रमाणावर पाउस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
