खेड : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दिला जाणारा मराठा भूषण पुरस्कार खेड तालुक्यातील नामांकित उद्योजक समाजसेवक, गोरक्षक विश्वास दादा कदम यांना प्रदान करण्यात आला.
खेड तालुक्यातील दहिवली गावचे सुपुत्र व्यवसायानिमित्त खेड तालुक्यातील सुकिवली या ठिकाणी वास्तव्यास असणारे एक दानसूर व्यक्तिमत्व म्हणून सामाजिक अस्तित्व त्यांनी निर्माण केले आहे .
त्यांच्या कामाची दखल घेत रत्नागिरी जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दिला जाणारा मराठा भूषण पुरस्कार २०२५ साठी विश्वास दादा कदम यांची निवड करून हा पुरस्कार १४ फेब्रुवारी २०२५ रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव, संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सावंत यांच्या उपस्थित होते.
