उरण (विठ्ठल ममताबादे ) : लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती आणि अखिल आगरी समाज परिषद या मेळाव्यात महाराष्ट्रचे वनमंत्री राज्य मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उरण तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा रेखा घरत यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आंदोलन मध्ये सहभाग घेतल्याने त्यांना दि. बा. पाटील योध्दा सन्मानचिन्ह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रेखा घरत या राजकारण व समाजकारणामध्ये सक्रिय आहेत. विविध आंदोलने, संपामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग असतो. महिलांच्या अनेक समस्या त्यांनी सोडविल्या आहेत. तसेच लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चळवळीत त्या सक्रिय होत्या. त्यामुळे त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रेखा घरत यांना पुरस्कार मिळाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
