रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत कार्यरत मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे सर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे आणि सहयोगी अधिष्ठाता, कृषि तंत्रज्ञान शिक्षण, डॉ. राजेश ठोकळ यांच्या परवानगीने डॉ. राकेश जाधव, सहाय्यक प्राध्यापक यांनी ‘टेक्नॉलॉजी फोरकास्टिंग अँड फोरसाईट मेथड्स इन ॲग्रिकल्चरल अँड अलाइड सेक्टर’ या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दी. ०३ ते ०७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान सहभाग घेतला. या प्रशिक्षणाचे आयोजन ICAR – नॅशनल ऍकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (ICAR-NAARM) हैद्राबाद, तेलंगणा यांनी केले होते.

या प्रशिक्षणामध्ये धोरणात्मक नियोजन आणि संशोधन प्रणालीचे व्यवस्थापन याचे ज्ञान आत्मसात केले. या कार्यक्रमामुळे संस्थात्मक संशोधन उपक्रमांना अत्याधुनिक प्रगती व नवकल्पनांना प्रोत्साहन मिळेल व त्या ज्ञानाचा फायदा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला होईल व या क्षेत्रातील योगदानाला बळकटिकरण देवून फायदा होईल. सदरचे प्रशिक्षण डॉ. राकेश जाधव यांनी यशस्वीरीत्या आत्मसात केले.
या ICAR-NAARM प्रशिक्षणातील सहभाग हा डॉ. जाधव यांना अत्यंत मौल्यवान अनुभव ठरला आहे, ज्यामुळे ज्ञानवृद्धी तसेच संशोधन उपक्रमांना अधोरेखीत करण्याची संधी त्यांना मिळाली. सदरच्या प्रशिक्षणामध्ये उपस्थित राहण्याकरिता मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे प्राचार्य, डॉ. आशिष मोहिते यांनी विशेष प्रयत्न केले.
