न्यू इंग्लिश स्कूल मोरा शाळेचा दहावीचा निकाल 93.87 टक्के

उरण (विठ्ठल ममताबादे ) : जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मोरा या शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा सन 2021- 22 या वर्षाचा एकूण शेकडा निकाल 93.87 एवढा लागला. कुमारी योगिता भीमसेन कोयंडे 76.20 गुण मिळवून प्रथम क्रमांक तर बनसोडे यशवंत धुलप्‍पा 73.40 गुण मिळवून द्वितीय क्रमांक तसेच कुमारी सय्यद मुन्नी नौशाद 72.80 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

शाळेचा एकूण निकालांमध्ये 22 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व एक विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून घवघवीत यश संपादन केले.शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर , वर्गशिक्षक मनोज म्हात्रे ,मंगला शिंदे अनिल पाटील ,स्वप्निल नागमोती ,रोहिणी घरत, सुप्रिया मुंबईकर मॅडम , सुनिता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.संस्थेचे सचिव माननीय जयवंत मढवी , शाळा समिती चेअरमन पी .एम .कोळी यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले तसेच शाळा समिती सदस्य आर .के .पाटील सर,
मुख्याध्यापक कोळी सर, शिंगटे सर ,प्राथमिक चे मुख्याध्यापक गावंड सर व सुगीन्द्र म्हात्रे ,जविन्द्र कोळी, किरण कोळी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE