श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण

उरण दि 19(विठ्ठल ममताबादे): पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने, विविध सामाजिक शैक्षणिक आदी कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे निसर्ग संवर्धना चा हेतू समोर ठेवून उरण तालुक्यातील कोपोली येथे असलेल्या श्री बापूजीदेव मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
वड, पिंपळ, कडूलिंब, बदाम आदि देशी झांडांचे वृक्षारोपण करून ती वृक्ष जगविण्याचा संकल्प संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी केला. वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी पाण्याची टाकी असल्याने वृक्षारोपण केलेल्या वृक्षाना नियमित पाणी मिळणार आहे. त्यामुळे सदर श्री बापूजीदेव मंदिर परिसरात लावलेली झाडे खत पाणी देउन जगविण्याचा संकल्प संस्थेनी केला. यावेळी कोप्रोलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री बापूजी देव मंदिर परिसरात कचऱ्यांची साफसफाई करण्यात आली. कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रस्तावना व सुत्रसंचालन संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी केले.यावेळी संस्थेचे सल्लागार सुधीर मुंबईकर,सामाजिक कार्यकर्ते नंदन म्हात्रे,सचिव प्रेम म्हात्रे, सहसचिव सादिक शेख, संस्थेचे सदस्य माधव म्हात्रे, सुविध म्हात्रे,प्रणय पाटील, नितेश पवार,आकाश पवार, साहिल म्हात्रे, प्रणित पाटील, आर्यन पाटील अर्णव  पाटील आदी संस्थेचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.:
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE