दापोली : अवैधपणे रान कोंबड्यांची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे नितीन शांताराम झाडेकर (वय 34, रा. कुंभवे) आणि आशिष अशोक पेडणकर (वय 32, रा. वाकवली, तालुका दापोली) अशी आहेत.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी छापा टाकून जंगलात लपवलेले शिकारी साहित्य आणि मृत रान कोंबड्यांना जप्त केले. पुढील तपास वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
