- ‘रामशेठ ठाकूर मैदाना’चे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उदघाटन
- गव्हाणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
उरण (विठ्ठल ममताबादे ) : “मतभेद विसरून धावपळ करणारा नेता महेंद्रशेठ घरत आहे, तो केवळ राजकारण करत नाही. विकास कामांत पुढाकार घेतो, अश्वारूढ पुतळ्याच्या आरक्षित जागेसाठी महेंद्रशेठने खूप चांगले प्रयत्न केलेत, म्हणूनच लवकर शिवरायांचा पुतळा आकारास येईल, गव्हाणजवळ लवकरच शिवसृष्टी उभी राहील” असे रामशेठ ठाकूर यांनी गौरोद्गार काढले.
“शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यात खूप कष्ट उपसले, त्यांनी फक्त रयतेचाच विचार केला, आपणही शिवरायांचे विचार जगायला हवेत,” असेही मत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे भव्य छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा गव्हाण-कोपर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रामशेठ ठाकूर बोलत होते.
“जगाचे मॅनेजमेंट गुरू म्हणून शिवराय समजले जातात. त्यांचा अश्वारूढ भव्य पुतळा
उभारण्याचे स्वप्न 28 वर्षांपूर्वी आम्ही पाहिले होते. ते आकारास येण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत, आता लवकर अश्वारूढ पुतळा उभारून स्वप्न साकार होईल, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले.
यावेळी ‘रामशेठ ठाकूर मैदाना’चे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
ओवी देशमुख, स्वरा ठाकूर, त्रियांश मोकल या चिमुकल्यांनी शिवरायांवर केलेल्या भाषणाने आणि उलवा वारियर्स ग्रुपने लाठी-काठी, तलवारबाजीच्या कसरतीने मान्यवरांची मने जिंकले. अंगावर रोमांच उभे राहिले. यावेळी बालकलाकारांनी सादर केलेल्या अभूतपूर्व कलेला प्रोत्साहन म्हणून रामशेठ ठाकूर यांनी 20 हजारांचे बक्षीस महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते दिले.
यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाऊशेठ पाटील, वाय. टी. देशमुख, अरुणशेठ भगत, रघुशेठ घरत, वसंत म्हात्रे, वसंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
