- पेण येथील कोकण विभागीय टीडीएफची बैठक संपन्न
- बैठकीत घेण्यात आले अनेक महत्वाचे निर्णय
उरण (विठ्ठल ममताबादे ) : बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या सेवक सहकारी पतपेढी मर्या. पेण येथे कोकण विभागीय टीडीएफची बैठक अतिशय उत्साहात संपन्न झाली. या बैठकीला ठाणे, पालघर, रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण विभागीय लोकशाही आघाडीचे सर्व सभासद तसेच काही जिल्ह्यांचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला सभेचे अध्यक्ष राज्याचे कार्याध्यक्ष नरसू पाटील सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली.तदनंतर या बैठकीमध्ये विषय पत्रिकेनुसार कामकाज सुरु करण्यात आले.
या बैठकीत विभागातील सर्व सभासदांच्या व उपस्थित जिल्हा पदाधिकाऱ्यांनी एकमताने कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडीची पुढील पाच वर्षासाठी कार्यकारणी निश्चित करण्यात आली.
नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे :
अध्यक्ष-श्री.सागर पाटील ( रत्नागिरी ),
कार्याध्यक्ष – श्री.संतोष पावडे ( पालघर) ,
उपाध्यक्ष -मायकल घोंसाल्विस ( वसई), रमेश कृष्णा म्हात्रे ( रायगड),श्री.अंबर घोलप ( ठाणे ) श्री. अविनाश पाटील ( रत्नागिरी),श्री.अजय शिंदे ( सिंधुदुर्ग), सचिव – श्री.राजेंद्र पालवे ( रायगड), सहसचिव -श्री सुशांत कविस्कर ( रत्नागिरी), श्री विजय मयेकर ( सिंधुदुर्ग ), कोषाध्यक्ष- श्री सुरेंद्र शिंदे ( ठाणे ),संघटक -श्री गणेश प्रधान ( पालघर ), श्री. संभाजी देवकते रत्नागिरी, महिला प्रतिनिधी – श्रीम अर्चिता कोकाटे ( रत्नागिरी ),श्रीम. मीनल गायकवाड (पालघर),कार्यकारणी सदस्य म्हणून श्री.रुपेश वझे ( डहाणू), श्री.रमाकांत गावंड ( रायगड),श्री.सचिन मिरगल (रत्नागिरी), श्री.अशोक गीते ( सिंधुदुर्ग), स्वीकृत सदस्य म्हणून श्री. के डी पाटील ( पालघर), श्री.भालचंद्र नेमाडे( मीरा-भाईंदर),श्री. विनोद पन्हाळकर ( रायगड) यांची निवड करण्यात आली आहे.विषय क्रमांक २ नुसार महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्य अधिवेशन कोकण विभागातील पालघर जिल्ह्यामध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या बैठकीला कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमधून अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकण विभागीय कार्यकारणी निवडीनंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी अत्यंत उत्साहात नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. कोकण विभागीय कार्यकारी निवडीचे कामकाज महाराष्ट्र टीडीएफचे राज्य कार्याध्यक्ष नरसू पाटील सर व राज्य सचिव रोहित जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
