उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरणमधील ज्येष्ठ पत्रकार व विधीतज्ञ शेखर पाटील यांच्या विद्या अकॅडमी चे उद्घाटन उरणपंचायत समितीचे माजी सभापती ऍड. सागर कडू यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना सागर कडू म्हणाले की, शेखर पाटील हे संघर्षातून पुढे आलेले आहेत. त्यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी वकिलीचे शिक्षण घेतले आहे मास्टर ऑफ लॉ पदवी घेतली आहे त्यांनी विविध पदव्या घेतलेल्या आहेत कॉलेज जीवनापासून पत्रकारिता करीत आलेले आहेत त्यांना समाजाची जाण आहे. उरण तालुका गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. डाव्या चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांच्या विद्या अकॅडमीमधून सर्वसामान्यांना नक्कीच न्याय मिळेल जनसामान्यांचे ऑफिस म्हणून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम त्यांच्या या अकॅडमीच्या माध्यमातून घडो. आजवरचा त्यांचा अनुभव समाजाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांनी देखील विद्या अकॅडमीला शुभेच्छा संदेश पाठवलां. यावेळी उरण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, माजी जि प सदस्य चारुदत्त पाटील, महिला अध्यक्षा सीमाताई घरत, ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र नाईक, शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस यशवंत ठाकूर यांनी शेखर पाटील यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छापर भाषणे केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेएनपीटी शाळेचे प्रिन्सिपल गिरीश पाटील यांनी केले.कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्ष सीमाताई घरत चाणजे ग्रामपंचायत उपसरपंच प्रदीप नाखवा, एडवोकेट श्रीधर कवडे,एडवोकेट ममता पाटील, कार्यालय चिटणीस नयन म्हात्रे, फेडरेशनचे सचिव वाघ सर, संचालक डीडीकेणी, संचालक महेंद्र कुडतरकर ग्रामपंचायत सदस्य रवी पाटील,आनंद नगरचे अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, शिवसेनेचे नेते रमेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, एडवोकेट विनायक खेतल,चाणजे विभाग चिटणीस भारत राज थळी, माजी नगरसेविका लता पाटील, शहराध्यक्ष नयना पाटील,शहर उपाध्यक्ष रंजना पाटील, पदाधिकारी दीपा कोळी, महिला मंडळाचे अध्यक्ष दीपिका ठाकूर, सलीम भाई,मनोज पाटील, अनंत घरत, नारायण पाटील, दिलीप पाटील,संजीवन पाटील, रमाकांत म्हात्रे, नारायण तांडेल, प्रदीप पाटील, समीर गाडे,मनीष मुंबईकर,केशव गावंड,लहू शिंदे जयेश वत्सराज, प्रकाश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गिरीश पाटील यांनी केले. यावेळी विविध मान्यवरांनी शेखर पाटील यांना फोन द्वारे, फेसबुक, व्हाट्सअप आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शुभेच्छा दिल्या.
