- महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती
मुंबई : लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्च चा वितरण बारापर्यंत सुरू राहणार मुंबई : योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक ७ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे.ही प्रक्रिया दिनांक १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये व मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यात एकूण ३००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे, असा दिलासा ना. तटकरे यांनी दिला आहे
