उरण (विठ्ठल ममताबादे ) : इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे राज्यस्तरीय कायाकल्प टीमनी भेट दिली. यामध्ये डॉ. मिथून खेरडे, डॉ. अमृता मॅथ्यु व डॉ. किरण शिंदे व श्रीम. वावरे सिस्टर यांनी भेट दिली.या प्रसंगी डॉ. बाबासो काळेल वैदयकिय अधीक्षक, डॉ. मृणालिनी कदम, डॉ. प्रकाश हिमगिरे तसेच रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या दिवशी राज्यस्तरीय टीमने सुरुवातीला इंदिरा गांधी रुग्णालयातील बाहेरील स्वच्छता, कंपाऊड, बगीचा, पोस्ट मार्टम रुम, निर्लेखन रुम, रुग्णवाहीका स्वच्छता, पार्किंगची पाहणी केली. त्यानंतर रुग्णालयातील औषध वितरण विभाग, औषध साठा रुम, आयुष विभाग, वैदयकीय अधिकारी विभाग इंजेक्शन विभाग, कार्यालय, प्रयोगशाळा विभाग, दंत विभाग, सर्व शौचालयाची स्वच्छता, ऑपरेशन थिएटर, प्रसुती कक्ष, महिला वार्ड, पुरुष वार्ड, टीबी विभाग, मलेरिया विभाग, आरबीएसके विभाग, आयसीटीसी व लिंक एआरटी विभाग, डोळे तपासणी विभाग, अशा सर्व प्रकारच्या विभागात जावुन टीमने संबधीत विभागाच्या कर्मचा-याच्या कामाची माहिती, सर्व रजिस्टरची तपासणी व स्वच्छतेची पाहणी केली.
या पाहणी पथकाने रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे समाधान व्यक्त केले. तसेच आणखी सुधारणा करण्यासाठी काही सुचना सुध्दा देण्यात आल्या. तसेच वैदयकिय अधिक्षक डॉ. बाबासो काळेल यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले.
