आ. महेश बालदी यांना मातृशोक

  • गंगादेवी बालदी यांच्या निधननिमित्त रविवारी उरण मध्ये शोकसभा

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (दि. १४) सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या.

आमदार महेश बालदी यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याचे वृत्त समजताच भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, वहाळ साई मंदिराचे संस्थापक रवीशेठ पाटील,यांच्यासह पोलीस अधिकारी, इतर विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी गंगादेवी बालदी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहून परिवाराचे सांत्वन केले.

कै. गंगादेवी बालदी यांच्या पार्थिवावर सायंकाळी उरण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रविवारी १६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत यु. ई. एस स्कूल (पालक मैदान ) बोरी उरण रोड येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE