शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे रायगड जिल्हा पदाधिकारी जाहीर

उरण (विठ्ठल ममताबादे ) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या रायगड जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर झाल्याने जिल्ह्यातील गोर गरिबांचे अनेक प्रश्न यामुळे सुटण्यास मदत होणार आहे. गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यात शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष नेहमी अग्रेसर राहिली आहे.व लोकांना या संघटनने न्याय सुद्धा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर या सर्व नियुक्त्या महत्वाच्या मानल्या जात आहेत.

कक्ष जिल्हा संघटक संतोष ठाकूर (अलिबाग, पेण, रोहा, मुरूड), शशिकांत डोंगरे (पनवेल, कर्जत, उरण, खालापूर), कक्ष उपजिल्हा संघटक सुनित पाटील (पनवेल, उरण तालुका), कक्ष तालुका संघटक – ओमकार घरत (उरण तालुका), गुरुनाथ पाटील (पनवेल), उमेश सावंत (कर्जत), कक्ष शहर संघटक- लीलाधर भोईर (खांदा कॉलनी), राजेश केणी (कळंबोली शहर), सचिन ठाकूर (खारघर), कक्ष उपशहर संघटक शंकर सोनुले (खारघर, सेक्टर १ ते १९), कमलेश शर्मा (खारघर सेक्टर २० ते ३६), सुमित पाटील (तळोजा), संदीप कदम (तळोजा फेज १ व २), कक्ष शहर संघटक भरत शिंदे (कामोठे), कक्ष उपशहर संघटक- गणेश खांडगे (कामोठे), कक्ष शहर संघटक-गणेश म्हात्रे (उलवे), संदीप जाधव (उरण शहर), कुणाल कुरघोडे (पनवेल शहर), आनंद पाटील (न्यू पनवेल शहर), मोहम्मद जलील जहीर खान (तळोजा शहर), कक्ष विभाग संघटक अनंता सांगळेकर (पळस्पे जिल्हा परिषद) या सदस्यांच्या नियुक्ता करण्यात आल्या आहेत.

या नियुक्त्या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असून कक्षकार्य बघून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.नियुक्ती झालेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE