सकल हिंदू समाज उरणच्या वतीने गुढीपाडव्या निमित्त शोभायात्रा

उरण, दि ३० (विठ्ठल ममताबादे ): गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील पवित्र सण असून गुढीपाडव्या निमित्त हिंदू धर्मातील नागरिक गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरवात करतात. गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरवात होते. उरण मध्ये नवीन वर्षाची सुरवात सकाळी शोभायात्रेने झाली. उरण मध्ये सकल हिंदू समाज उरणच्या वतीने भव्य दिव्य अशी शोभा यात्रा काढण्यात आली.

चैत्र शुक्ल १, प्रतिपदा शके १९४६ हिंदू नव वर्ष दिन रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी शाळा पेन्शनर्स पार्क उरण शहर, गणपती चौक, राजपाल नाका, विमला तलाव, एन आय हायस्कूल, डॉ नानासाहेब धर्माधिकारी शाळा पेन्शनर्स पार्क या मार्गावर शोभा यात्रा काढण्यात आली.

या शोभयात्रेत सर्वच स्तरातील, विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. वादन एक कला ढोल ताशा पथकाच्या ढोल ताशाने उरण परिसर दुमदुमून गेले. शोभायात्रेत पारंपरिक भजन, एन आय हायस्कूल शाळेचे लेझिम पथक व महिलांनी काढलेल्या बाईक रॅली मुळे शोभायात्रेला शोभा आली. विविध मर्दानी खेळ व साहसी खेळ दाखवून विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली.या शोभा यात्रेत विविध वेशभूषा परिधान करून विद्यार्थी नागरिक सहभागी झाले होते.

या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उरण विधानसभा मतदार संघांचे आमदार महेश बालदी उपस्थित होते. या शोभयात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, एन आय हायस्कूल उरण, कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय उरण, आर्ट ऑफ लिविंग उरण , उरण महिला सामाजिक शैक्षणिक संस्था उरण, वुमन क्लब उरण,माई फॉउंडेशन उरण,अरीत फॉउंडेशन उरण, कुटुंबिनी महिला संघ उरण, मी उरणकर ढोल ताशा पथक उरण, वादन एक कला ढोल ताशा पथक, सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र उरण, सद्गुरू श्री नरेंद्र महाराज उपासना केंद्र उरण, इस्कॉन संघटना उरण, वारकरी संप्रदाय उरण, उरण तालुका मराठी पत्रकार संघ, कै आश्विन पाटील मित्र मंडळ उरण, योगा विथ पूनम ग्रुप, उरण सामाजिक संस्था, उरण मधील विविध सामाजिक संस्था संघटना आदी संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य शोभायात्रेत मोठया संख्येने उपस्थित होते.

शोभायात्रेच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत झाल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE