- शिव संस्कृती, गोवर्धन व पर्यावरण सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम
- पर्यावरण संरक्षण, संवर्धनसाठी संस्थेचा पुढाकार
उरण (विठ्ठल ममताबादे ) : रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांना कुठेतरी आसरा मिळावा, गाय वासरू आदी जनावरांचे उन-पाऊस, हिवाळा वादळवाऱ्यापासून संरक्षण व्हावे, अन्न पाण्या वाचून त्यांचे मृत्यू होऊ नये या दृष्टीकोणातून संस्कृतीचे संवर्धन, संरक्षण करत सामाजिक बांधिलकी जपत शिव संस्कृती गोवर्धन व पर्यावरण सामाजिक संस्थेच्या वतीने गुढीपाडवा या हिंदू धर्मातील पवित्र सणाच्या शुभ मुहूर्तावर उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड मधील सेक्टर ५१, ए स्मशान भूमी जवळ येथे गोशाळेचे सर्व संचालकांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.
सकाळी ७ वाजता प्रसिद्ध उद्योजक तथा संस्थेचे उपाध्यक्ष कैलास म्हात्रे व भावना म्हात्रे यांच्या हस्ते गोठ्याचे पूजन झाले. तदनंतर संस्थेचे अध्यक्ष जगजीवन भोईर, सुरेखा भोईर यांनी गुढी उभारून गुढीचे व गोठ्यातील गाय वासरूचे पूजन केले. या प्रसंगी शिव संस्कृती गोवर्धन व पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जगजीवन भोईर, उपाध्यक्ष कैलास म्हात्रे, सेक्रेटरी प्रदीप नाखवा, खजिनदार नितीन ठाकूर, संचालक दिपक ठाकूर, जीवन म्हात्रे, समीज पाटील, विठ्ठल ममताबादे, प्रतीक पाटील, सामाजिक कार्यकर्ते – सोमनाथ भोईर, भारत काटे, दिपक पाटील, शिवकुमार मढवी, सुरेखा भोईर, भावना म्हात्रे, भावना भोईर, स्वप्नील कवळे, अजयराजे भोसले,अनिरुद्ध महेश म्हात्रे ,गोसेवक काशिनाथ वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध भागातील गाई गुरे वासरांचे मृत्यूचे वाढते प्रमाण व गाई गुरे यांची दिवसेंदिवस घटनारी संख्या लक्षात घेता निसर्गाचे, पर्यावरणाचे, पशु पक्ष्यांचे संवर्धन संरक्षणाचे कार्य करणाऱ्या शिव संस्कृती गोवर्धन व पर्यावरण सामाजिक संस्थेचे हे पहिलेच उपक्रम असून या उपक्रमाला सर्वच स्तरातून जनतेचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
संस्थेचे अध्यक्ष जगजीवन भोईर यांच्या संकल्पनेतून व सर्व संचालक, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमातून द्रोणागिरी नोड परिसरात पहिल्या गोवर्धन गोठ्याचे /गो शाळेचे उदघाटन झाले. या गोठ्यात गाई वासरूचे संगोपन केले जाणार आहे. अशा या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
