निवळी-जयगड मार्गावर अवजाड वाहतुकीने घेतला दुचाकीस्वार तरुणाचा बळी

  • संतप्त जमावाने अपघात केलेला ट्रक पेटवून दिला
  • ट्रकचालकाने एक किलोमीटरपर्यंत दुचाकी नेली फरपटत

रत्नागिरी : निवळी ते जयगड मार्गावरील अवजड वाहतुकीच्या डोकेदुखीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर मंगळवारी सकाळी एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. किरण कृष्णा पागडे (४२) या दुचाकीस्वार तरुणाचा या अपघातात हकनाक बळी गेला आहे.

अपघातात जीव गमावलेले किरण पागडे

रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी किरण पागडे हे चाफे येथून आपल्या दुचाकीवरून ( जाकादेवीकडे जात असताना समोरून येणाऱ्या एम एच ०४०/ बी एल ९९९८ या क्रमांकाच्या ट्रकने त्याला धडक दिली. अपघातात किरण यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र एवढा मोठा अपघात घडूही ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळी न थांबवता त्याची दुचाकी घटनास्थळापासून जवळपास एक किलोमीटर दूर फरपटत नेली.
या अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. दुचाकी स्वराला चिर डून नंतर घटनास्थळी न थांबता पलायन केल्याने स्थानिक ग्रामस्थांनी ट्रेकचा पाठलाग करून तो पेटवून दिला. यामुळे परिसरात काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.

 


या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी तातडीने रवाना झाले. त्यांनी परिस्थिती त्यांनी बळाचा वापर करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, निवळी ते जयगड मार्गावर अवजड वाहतुकीमुळे ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली असून, या समस्येवर उपाययोजना न झाल्याने हा मुद्दा मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता झालेल्या या अपघातानंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE