रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्या ठाणे तसेच दादरपर्यंत राहणार आहेत.
या संदर्भात कोकण रेल्वे माहितीनुसार गाडी क्रमांक 12134 ही मंगळूरु ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी गाडी दि. 15 एप्रिल 2025 पर्यंत निर्धारित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऐवजी ठाणे स्थानकापर्यंत धावणार आहे. याच बरोबर गाडी क्रमांक 22120 ही मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस दि १५ एप्रिल २०२५ पर्यंत निर्धारित सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच धावणार आहे.
मडगाव ते मुंबई दरम्यान धावणारी दैनंदिन जनशताब्दी एक्सप्रेस ( १२०५२ ) ही गाडी देखील दिनांक १५ एप्रिल २०२५ पर्यंत दादरस्थानकात आपला प्रवास संपवणार आहे. ही गाडी देखील नेहमी मडगाव ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावते.
