डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधान सन्मान मंच रत्नागिरीतर्फे अभिवादन

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान सन्मान मंच, रत्नागिरीतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी रत्नागिरी शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास मंचाचे पदाधिकारी अनघाताई जैतपाल, शैलेश बेर्डे, अ‍ॅड. राहुल कदम, यश भटकर, प्रीतम चव्हाण, ओंकार मजगावकर, प्रदीप साळवी, राकेश नलावडे हे उपस्थित होते.

या वेळी रत्नागिरी बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. रत्नदीप चाचले आणि हॉटेल व्यावसायिक अभय दळी हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा गौरव करत त्यांच्या सामाजिक न्याय, बंधुता व संविधान निर्मितीमधील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE

06:17