शिवसेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

उरण (विठ्ठल ममताबादे ) : १४ एप्रिल २०२५ रोजी शिवसेना (शिंदे गट )उरण विधानसभेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी  घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त उरण शहर बौद्धवाडी येथील पवित्र बुद्धविहार येथे भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

या प्रसंगी शिवसेना उरण विधानसभा जिल्हा प्रमुख अतुल भगत, उरण तालुका प्रमुख दिपक ठाकूर,उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे , प्रभारी उरण शहर प्रमुख सुनील भोईर, चाणजे जिल्हा परिषद विभाग प्रमुख अक्षय महेश म्हात्रे, केगाव पंचायत समिती उपविभाग प्रमुख महेश पाटील, डोंगरी शाखाप्रमुख अक्षय घरत, जसखार शाखा प्रमुख मेघनाथ ठाकूर, भेंडखळ शाखा प्रमुख राकेश भगत, युवासेना शाखा प्रमुख हर्षल घरत, ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र म्हात्रे आणि अन्य शिवसैनिक पदाधिकारी यांच्यासह अन्य शिवसैनिक पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE