रत्नागिरीची ‘कॅरम क्वीन’ आकांक्षा कदम शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी

रत्नागिरी : रत्नागिरीची ‘कॅरम क्वीन’ आकांक्षा कदम ही महाराष्ट्र शासनाच्या २०२३-२४ या सालासाठी शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी ठरली आहे. रत्नकन्या आकांक्षाला हा पुरस्कार जाहीर होताच तिचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

रत्नागिरी येथील आकांक्षा उदय कदम ही शिर्के हायस्कूलची माजी विद्यार्थिनी आहे. बारा वेळा तिने कॅरममध्ये राज्य विजेतेपद पटकाविले आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्य पातळीवर तिने आतापर्यंत ३० सुवर्णपदके, दहा सिल्वर तर 11 ब्रांज मेडल मिळवली आहेत.
सध्या तेरावीमध्ये मुंबईमध्ये शिक्षण घेणाऱ्या आकांशा हिला तिचे मामा आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरुखकर, महेश देवरुखकर, यश कदम, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे यतीन ठाकूर आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अरुण केदार यांच्यासह शिर्के हायस्कूलचे विनोद मयेकर व जिल्हा कॅरम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या पुरस्काराची मंगळवारी घोषणा केली. यानुसार १८ एप्रिल रोजी या पुरस्काराचे वितरण पुणे बालेवाडी येथे होणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE